*बार्डी येथील पांडुरंग गायकवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.* *शैक्षणिक. सामाजिक.. सांस्कृतिक व क्रीडा.. आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार....!*

*बार्डी येथील पांडुरंग गायकवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.*   *शैक्षणिक. सामाजिक.. सांस्कृतिक व क्रीडा.. आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार....!*

करकंब /प्रतिनिधी :-

बार्डी ता पंढरपूर येथील शैक्षणिक कार्याबरोबरच इतर कार्यामध्ये
कार्य केल्याबद्दल पांडुरंग गायकवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विशेष सत्कार व सन्मान पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने व बार्डी येथील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात नुकताच सत्कार करण्यात आला. 

सोलापूर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघ सोलापूर यांच्यावतीने आपल्या शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय ,क्रीडा व सांस्कृतिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बार्डी येथील  पांडुरंग गायकवाड सर यांना मिळाल्याबद्दल पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने व बार्डी येथील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक महेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूरचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे सर , ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे , करकंब व
बार्डीचे पोलीस पाटील अँड.नानासाहेब शिंदे अमर पटेल सर, सागर लाटे, गणेश लोंढे ,हनुमंत कवडे आदी उपस्थित होते.