*रामभाऊ जोशी हायस्कूल च्या नुतन मुख्याध्यापक पदी हेमंत कदम यांची नियुक्ती*
करकंब: /प्रतीनिधी
देशातील अग्रगण्य,नावलौकिक दयानंद अॅग्लो वैदिक(डी.ए.व्ही) शैक्षणिक संस्थेच्या ग्रामीण भागातील करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल च्या कायम मुख्याध्यापक पदी श्री हेमंत कदम यांची नेमणूक झाल्याबद्दल आणि पर्यवेक्षक पदी धनवंत करळे यांची निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती व शालेय शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या भौतिक सुविधा बरोबरच "शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण ग्रामीण शाळा" करण्याचा मानस असून या पंचक्रोशीतील सर्व सोयीसवलत युक्त माध्यमिक शाळा, विद्यार्थ्यांना क्रिडाक्षेत्रातील नावलौकिक मिळविण्याचा आणि प्रत्येक माझी विद्यार्थ्यांना "माझी शाळा, माझा अभिमान" वाटावा असे कार्य करणार असल्याचे नुतन मुख्याध्यापक हेमंत कदम यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रम,शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण या घटकांचे नियोजन सर्व शिक्षकांच्या मदतीने करणार असल्याचे मनोगत नुतन पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी व्यक्त केले.
यावेळी शालेय मार्गदर्शक जि.प.माझी अध्यक्ष बाबुराव(अण्णा) जाधव,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण (तात्या)वंजारी,पत्रकार मनोज पवार यांनीही सत्कारपर मार्गदर्शन व आपले मनोगत व्यक्त केले
या सत्कार कार्याक्रमाला संजय मोहीते,संजय धोत्रे,मारूती व्यवहारे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले आणि विनय कुलकर्णी यांनी सर्वाचे आभार मानले