*पंढरपूर ते तिऱ्हेमार्ग रस्त्याचे कामासाठी विठ्ठल परिवाराचे नेते चेअरमन अभिजीत पाटील मैदानात* *डांबरीकरण करण्यासाठी  मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास सादर*.

*पंढरपूर ते तिऱ्हेमार्ग रस्त्याचे कामासाठी विठ्ठल परिवाराचे नेते चेअरमन अभिजीत पाटील मैदानात*  *डांबरीकरण करण्यासाठी  मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास सादर*.

*प

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर पासून तिऱ्हे मार्गे  जाणाऱ्या रस्त्यासाठी मागील अनेक दिवसापासून  प्रयत्न केले जात आहेत. परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. याबाबत आता विठ्ठल परिवाराचे नेते चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समवेत एका शिस्टमंडळ यांनी हा रस्ता लवकरात लवकर  डांबरीकरण करावा या मागणीचे निवेदन सार्वजनिक विभागाकडे देण्यात आले आहे. 

सदर रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात होत असतात यातून मोठी हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. येत्या १ ऑक्टोबर पासून साखर कारखाने सुरू होणार आहेत. शेतकरी बांधवांसाठी हे अतिशय महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करून सदर रस्त्याची त्यापूर्वी दुरुस्ती होणे क्रमप्राप्त आहे. या मागणीवर लवकरच योग्य कारवाई केली जाईल, असा विश्वास आहे.यावेळी श्री विठ्ठल सह.सा.का. चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील, श्री आनंदबापू पाटील,श्री विठ्ठलनाना पाटील, श्री सचिन रोंगे, श्री दत्तात्रय भाऊ भोसले उपस्थीत होते.