*करकंब येथील पोस्ट ऑफिस मध्ये नूतन सब पोस्ट मास्तर यांचे केले स्वागत.*

*करकंब येथील पोस्ट ऑफिस मध्ये नूतन सब पोस्ट मास्तर यांचे केले स्वागत.*

करकंब /प्रतिनिधी :-

रत्नागिरी येथून करकंब येथील पोस्ट ऑफिस मध्ये  नूतन रुजू झालेले सब पोस्ट मास्तर-एन. बी .गुठे यांचा विशेष सत्कार आणि स्वागत करकंब पोस्ट ऑफिस चे पोस्टल असिस्टंट-व्हि .डी .मुजावर यांनी केले.
     यावेळी पत्रकार लक्ष्मण शिंदे, पोस्टमन-सुनील पाटील, एमटीएस-दत्तात्रय घोडके, नितीन माळवदकर, तेजस वाघमारे, तसेच ग्रामीण डाक सेवक-जितेंद्र मगदूम, दत्तात्रय बामणे, अजित पाटील, सुतार आदि सह ग्राहक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
       करकंब येथील पोस्ट ऑफिस मध्ये नव्याने रुजू झालेल्या सब पोस्ट मास्तर मुळे करकंब सह ग्रामीण भागातील ग्राहकांना अजून वेगाने सुविधा उपलब्ध होणार असल्याने करकंब सह परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.