*अपर पोलीस आयुक्त विरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप* *पोलिसांनी दिला वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश....!*

*अपर पोलीस आयुक्त विरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*  *पोलिसांनी दिला वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश....!*

करकंब/ प्रतिनिधी:-
 *वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचाच वाढदिवस हा मोठा खर्च करून  साजरा केला जातो . परंतु पोलीस हवालदार गणेश शिंदे महामार्ग पोलीस मदत केंद्र, मोडनिंब यांनी स्वखर्चाने सोलापूर ग्रामीण चे तत्कालीन कर्तव्यदक्ष  पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू सध्या अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मुंबई यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उजनी कॉलनी टेंभुर्णी  येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना  पोलीस उपनिरीक्षक भारत रोकडे, पोलीस हवालदार दादासाहेब लोंढे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच जि. प शाळेच्या देखभाली म्हणून पोलीस उपनिरीक्षक भारत रोकडे यांनी रोख 5000/-रु. मदत ही शाळेचे मुख्याध्यापक श्री. लोंढे सर यांचे कडे सुपूर्द केली.*

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय लोंढे सर , संतोष वरकुटे सर, खटके मॅडम श्री. प्रशांत शिंदे,संजय लांडगे सर, नानासाहेब चोपडे, अतुल घुले, आगळे मॅडम ,सविता सुकाळे, मनीषा कांबळे मॅडम, अनिता तळेकर मॅडम
श्री बाळासाहेब लोंढे, अनिल पवार व पालक वर्ग उपस्थित होते.