*कोरोनाने मृत्यू ,वारसांना विमा कंपनीकडून धनादेश* *पंढरपूर तालुक्यातील सांगवी येथील लाभार्थ्यांना मिळाला लाभ*
करकंब/ प्रतिनिधी
सांगवी ता पंढरपूर येथील वडिलांसह दोन मुलांचा कोरणा ने एकाच कुटुंबातील बळी घेतला होता. घरातील करती धरती मंडळी गेल्याने सांगवी येथील अडसूळ कुटुंबावर मोठा आघात झाला होता. सांगवी येथील ह भ प रवींद्र महाराज मधुकर अडसूळ हे शेतीतील बरोबरच कीर्तनातून समाज प्रबोधन करीत होते. त्यांनी यापूर्वीLlC विमा प्रतिनिधी अरुण सुर्वे यांच्याकडे विमा उतरविला होता. त्यांच्याकडे दोन विमा पॉलिसी असल्याने त्यांचे वारसदार पत्नी श्रीमती माधुरी रवींद्र अडसूळ व मुलगा अभिजीत अडसूळ यांच्याकडे विमा प्रतिनिधी अरुण सुर्वे यांच्या हस्ते मृत्यू दावा रक्कम रुपये पाच लाख 56 हजार रुपयाचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी मा. मोहन वसंत आडसूळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे, नवनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. हा दावा एल आय सी कडे पेपर दिल्यापासून दहा दिवसात मिळाल्यामुळे एलआयसीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही मदत मिळवून दिल्याबद्दल सांगवी चे माजी उपसरपंच मोहन अडसूळ यांनी एल आय सी विमा प्रतिनिधी व एलआयसीचे आभार व्यक्त करून एल आय सी चा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन केले. याकामी एल आय सी विकास अधिकारी एच.एन. नामजोशी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. सदर क्लेम मिळवून देण्यासाठी विमा प्रतिनिधी अरुण सुर्वे यांनी विशेष प्रयत्न केले याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.