*करकंब येथे श्री संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी संपन्न.*
करकंब /प्रतिनिधी:
करकंब ता पंढरपूर येथील श्री संत रोहिदास नगर येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व धार्मिक कार्यक्रमाने संपन्न करण्यात आली.
सुरुवातीस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रोहिदास मंडळाच्या अध्यक्ष संतोष राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य, सचिन शिंदे पत्रकार लक्ष्मण शिंदे, शिवराज शिंदे विनायक राजगुरू प्रवीण शिंदे अनिल शिंदे दिनेश कांबळे सचिन तेली मंगेश शिंदे समाधान शिंदे सर्जेराव शिंदे तुकाराम शिंदे चिराग शिंदे यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव ग्रामस्थउपस्थित होते.