*फलटण ते बारामती रेल्वे मार्गाच्या पंतप्रधान मोदी यांचे हस्ते शुभारंभ* *खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने सुरू झाला हा नवीन मार्ग*

*फलटण ते बारामती रेल्वे मार्गाच्या पंतप्रधान मोदी यांचे हस्ते शुभारंभ*  *खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने सुरू झाला हा नवीन मार्ग*

पंढरपूर/प्रतिनीधी 

फलटण बारामती या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ दिनांक बारा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या रेल्वेमार्गासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले आहेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण ते पुणे जिल्ह्यातील बारामती या 38 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्गासाठी तेराशे पन्नास कोटी रुपये खर्च येणार आहे. फलटण माळवाडी मार्गे बारामती असा हा नवीन रेल्वे मार्ग असणार आहे.
या रेल्वेमार्गामुळे फलटण पासून पुणे मुंबई जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा होणार असून गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वेमार्गाची मागणी परिसरातील नागरिक व्यापारी करत होते. आता या नवीन रेल्वे मार्गामुळे उद्योग व्यापाराबरोबरच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.
 खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जयकुमार गोरे  आदी मान्यवरांनी टेली कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थिती नोंदवली.
तसेच इंदू दुबे DRM, अविनाश कुमार पांडे, डॉक्टर मिलिंद हिरवे SDRM, सुरेश पाखरे CE, जितेंद्र सिंह, विकास पराशर, व ज्योती माने, या रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती लावली.
हा रेल्वे मार्ग मंजूर करून दिल्याबद्दल पंतप्रधान, रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आभार मानले आहेत.