गादेगाव कोविड सेंटरला  अभिजित पाटील यांच्याकडून रुग्णांसाठी  बेडची  मदत!

गादेगाव कोविड सेंटरला  अभिजित पाटील यांच्याकडून रुग्णांसाठी  बेडची  मदत!

प्रतिनिंधी/पंढरपूर 


पंढरपूर तालुक्यातील वाढती रुग्ण लक्षात घेताच स्वतच्या डी व्ही पी  मल्टिप्लेक्स थेटरचे रूपांतर डीव्हिपी  हॉस्पिटलमध्ये करणारे,आणि  राज्यातील ऑक्सीजनच्या  तुटवड्यावर  तत्काळ  मार्ग काढून राज्यात एक आदर्श निर्माण करणारे आदर्श उद्योगपती साखर कारखान्याचे  चेअरमन   अभिजित (आबा) पाटील यांच्याकडून गादेगाव येथील कोविड सेंटर येथील रुग्णांसाठी  बेड भेट देऊन समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
      या त्यानी केलेल्या  आपल्या मदतीबद्दल गादेगावकर ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले आहे .

 तसेच याठिकाणी पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष  प्रशांत खलीपे  व गादेगाव मधील गणेश मेडिकलचे मालक गणेश बागल, संजीवनी मेडिकलचे मालक ओंकार रेडे, शिवतेज मेडिकलचे मालक गणेश बागल अध्यक्ष यांच्याकडूनही  या  सेंटर मधील रुग्णांना मदत म्हणून मोफत औषधे देण्यात आली.
त्या सर्वाचे गादेगावकर ऋणी असल्याचेही या कोविड सेंटरच्या सर्व प्रतिनिंधी यानी संगितले आहे .