पुरग्रस्त निधी पासून वंचित असणाऱ्या व्यापाऱ्यांना तत्काळ मदत मिळावी.. राष्ट्रवादी काँग्रेस कडून  निवेदनाद्वारे शासनाकडे केली मागणी

पुरग्रस्त निधी पासून वंचित असणाऱ्या व्यापाऱ्यांना तत्काळ मदत मिळावी..   राष्ट्रवादी काँग्रेस कडून  निवेदनाद्वारे शासनाकडे केली मागणी

पंढरपूर  प्रतिनिधी 
पंढरपूर शहरात २०२० साली आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले.नदीकाठच्या लोकांची ज्याप्रमाणे घरांचे नुकसान झाले त्याच प्रमाणे त्याभागातील व्यापारी बंधूंचेही नुकसान झाले.शासनाने यासंदर्भात तत्काळ पुरग्रस्त कुटुंबास मदत जाहिर करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले घरांचे पंचनामे व त्याच बरोबर व्यापाऱ्यांच्या  दुकांनाचेही पंचनामे करून व्यावसायिकांची पूर्ण कागदपत्रे पंचनाम्यात जोडूनही अनेक व्यापाऱ्यांना अद्यापही पूरग्रस्त निधी मिळाला नाही.
यासाठी पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त निधी पासून वंचित असणाऱ्या व्यापाऱ्यांना तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, सध्या लॉकडॉऊन मुळे व्यापारी बांधव हतबल झाले आहे.अशा अडचणीच्या काळात शासनाने पुरात झालेल्या नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,उपाध्यक्ष गिरिष चाकोते,सरचिटणिस दत्तात्रय माने,गणेश साळुंखे अण्णा पोपळे प्रकाश वाळके मंगेडकर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.