मोदींना पंतप्रधानपदी7वर्ष झाल्याबद्दल आ आवताडे यांच्या हस्ते कोरोना  योध्याचा सन्मान! मंगळवेढा भाजपाकडून केले होते कार्यक्रमाचे आयोज

मोदींना पंतप्रधानपदी7वर्ष झाल्याबद्दल आ आवताडे यांच्या हस्ते कोरोना  योध्याचा सन्मान!  मंगळवेढा भाजपाकडून केले होते कार्यक्रमाचे आयोज


पंढरपूर/प्रतिनिधी


 देशाचे  पंतप्रधान    ना .नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान शपथविधीस ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, मंगळवेढा यांचे कडून कोरोना योध्याचा सन्मान आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.

 जागतिक आपत्ती ठरलेल्या कोरोना विषाणूमुळे पसरत असलेल्या महाभयंकर साथीचा प्रसार तथा संसर्ग रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपापल्या खात्याला साजेसे कार्य करून राष्ट्र प्रेमाची अनोखी व्याख्या निर्माण केली. त्या अनुषंगाने  मंगळवेढा आरोग्य विभाग येथे आपली सेवा देणारे व कर्तव्य बजाविणारे आरोग्य सेवक यांना कोविड योद्धा या सन्मान पत्र देऊन त्यांच्या कार्याचा आणि शौर्याचा गौरव करण्यात आला.
    यावेळी माजी पालकमंत्री  लक्ष्मणराव ढोबळे ( सर), भा. ज. पा. जिल्हा संघटन महामंत्री. शशिकांत ( नाना ) चव्हाण, दामाजी शुगर संचालक  राजेंद्र ( बापू ) सुरवसे, भा. ज. पा. जिल्हा उपाध्यक्ष  औदुंबर वाडदेकर, समता पतसंस्था चेअरमन  अशोक माळी, नगरसेवक  दिपक माने, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,भा. ज. पा. जिल्हा चिटणीस  संतोष मोगले, भा. ज. पा. तालुकाध्यक्ष  गौरीशंकर बुरकूल, शहराध्यक्ष  गोपाळ भगरे, कर्मयोगी प्रतिष्ठानचे  बबलु सुतार, अविनाश मोरे ( सर ) आदी मान्यवर उपस्थित होते.