*करकंब येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८वी जयंती  विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी....!*

*करकंब येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८वी जयंती  विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी....!*


करकंब /प्रतिनिधी 

करकंब येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन-सरपंच तेजमाला शरदचंद्र पांढरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ह भ प श्रीकांत महाराज आरोळे,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच आदिनाथ देशमुख, सरपंच प्रतिनिधी तथा मा. ग्रामपंचायत सदस्य शरदचंद्र पांढरे, विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत, युवक नेते अजित सिंह देशमुख,महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता देशपांडे, युवा नेते अभिषेक पुरवत, उद्योजक अमोलदादा शेळके, पाणीपुरवठ्याचे माजी चेअरमन पोपट धायगुडे, अमरसिंह चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव,संतोष धोत्रे, बापू शिंदे, तुकाराम माने, मा. ग्रा. सदस्य सुनील मोहिते,सचिन शिंदे ,महेंद्र शिंदे, भाजपाचे तालुका सरचिटणीस लक्ष्मण वंजारी, उद्योजक राजाभाऊ देशमुख, नात्याबा मोहिते, सतीश खारे, रमेश खरे, ज्ञानेश्वर दुधाने, लक्ष्मण जाधव, सुरैयाआतार नागनाथ गायकवाड, नारायण गायकवाड , अविनाश जाधव, संजय जगताप,वंदना पंत,  आदी मान्यवरांसह ग्रामस्थ , बहुसंख्य महिला, अहिल्या फाउंडेशन करकंब चे सर्व पदाधिकारी व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचबरोबर या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक ग्रामपंचायत  सफाई कर्मचारी महिलांचा विशेष सन्मान व सत्कार उपस्थित मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. 
       यावेळी   पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी आपले आपले मार्गदर्शन व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक 5 जून रोजी सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय मोडनिंब रोड करकंब येथे बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन करून प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ  आयोजित करण्यात आलेला असून या निमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्वागत तोडकर यांच्या व्याख्यानासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी अहिल्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.