*रामभाऊ जोशी हायस्कूलच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.*
*रामभाऊ जोशी हायस्कूलच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.
करकंब/ प्रतिनिधी:-
सावित्रीबाई फुले यांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा. असे मत रामभाऊ जोशी हायस्कूलचे पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी व्यक्त केले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन सामाजिक कार्यात व्यतीत झाले असून त्या संपूर्ण देशापुढे एक आदर्श समाजसेविका , लेखिका व कवयित्री म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांचे लेखन कायमच समाजासाठी दिशादर्शक असून विद्यार्थिनींनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन सार्थक करावे असेही त्यांनी सांगितले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका मनिषा ढोबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना अत्यंत कठीण परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या अंगणात पोचवली त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला सन्मानाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने महिला शिक्षक व महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशालेतील अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी नरसिंग एबोते , नागेश घुले, सुरेश दहिगिरे , अभिषेक चोपडे , संजय पंचवाडकर , संजय पाटील, शकूर बागवान , अश्विनी शिंगटे , शेख मॅडम , रमेश कविटकर, माधव कांबळे ,सुभाष चौगुले , अर्जुन भंडारे , संगीता काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल अभंगराव यांनी केले तर आभार विनय कुलकर्णी यांनी मानले.