*शिवराज कदमचे सामान्य ज्ञान परीक्षेत यश*
प्रतिनिधी /पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील सुपूत्र व हातकणंगले तालुक्यातील पारगांव येथील एबीपी शिक्षण समुहातील विद्यार्थी शिवराज उमेश कदम यांने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन करीत केले आहे.
शिवराज कदम याने कै.दादासो शि.भोसले यांचे स्मरणार्थ आयोजीत करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच दरम्यान आयएफएस श्री संदिप हिंदुराव सर्यवंशी फौंडेशन माध्यमातून घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान व टॅलेंट स्टूडंट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शिवराज उमेश कदम याचे स्पर्धा आयोजक व शाळेच्यावतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
या यशासाठी त्याला एबीपी शिक्षण समुहातील तज्ञ शिक्षक यांचेसह वडील उमेश कदम, आई सुचिता कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर त्याच्या या यशाबद्दल एबीपी शिक्षण समुहाचे संस्थापक ए.बी.पाटील, सचिव आमोल पाटील, प्राचार्य एस.आर.पाटील, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह रोपळे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.