*तालुकास्तरीय समूह लोक नृत्य स्पर्धेत कानापुरी जि प शाळेचे यश.*
करकंब /प्रतिनिधी:-.
कान्हापुरी तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश मिळवले
शुक्रवार दिनांक - 13/01/2023 रोजी लोकमान्य विद्यालय पंढरपूर येथे तालुकास्तरीय समूह लोकनृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जि. प .प्रा. शाळा कान्हापुरी मोठा गटा ने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला .व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे , शिक्षण विस्तार अधिकारी लिगाडे , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. पवार मॅडम, उंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग जाधव साहेब, शाळेचे मुख्या. पांडुरंग माने सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष काळेल , उपाध्यक्ष गोविंद नगरे ,सरपंच प्रेमभैया चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना श्रीम. सुनिता गिरी, श्रीम. दिपाली वास्ते ,श्री निलेश अजगर, श्री ज्ञानेश्वर मगर, श्री बाळू खांडेकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.