*ज्ञानदीप मध्ये स्वामी विवेकानंद व जिजामाता जयंती साजरी*

*ज्ञानदीप मध्ये स्वामी विवेकानंद व जिजामाता जयंती साजरी*

करकब/प्रतिनीधी

नांदोरे ता पंढरपूर येथील जयहिंद प्रतिष्ठान नांदोरे संचालित ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज नांदोरे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष किरण भिंगारे,प्रा.सदानंद बनसोडे, प्रा.महेश शिंदे  मुख्याध्यापिका नसरीन तांबोळी ,राज शिरसट, आशा गायकवाड, अबोली करगळ,आदित्य थिटे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी गौरी कोळसे,प्रणिती भिंगारे ,सानिका गणेशकर,समर्थ वाघ,ओम जाधव,साक्षी थिटे, लोकेश काळे,आरती साळुंखे, राजनंदिनी जवळेकर, श्वेता साळुंखे,ऋतुजा नाईकनवरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आपले मनोगत वक्त केले,तसेच सर्व विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान केला होता.यावेळी उपस्थित अमोल मस्के,कुंडलिक तळेकर ,विनोद पिसे ,वंदना देशपांडे ,दिपाली थिटे,उमा वाघमारे,प्रिती शिंदे ,प्रियंका आमसुले,अनिता साबळे,लक्ष्मी पाटील,पूनम व्यवहारे व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश इंगोले व आभार प्रदर्शन विश्वास जवळेकर यांनी केले