*शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत करकंब येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न* *विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डीएव्ही शाळा प्रशासन सज्ज*

*शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत करकंब येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न*  *विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डीएव्ही शाळा प्रशासन सज्ज*

करकंब/ प्रतिनिधी:-
*दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे शासकीय आदेशानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात शाळेचा पहिला दिवस उत्साही व आनंदी वातावरणात व्हावा, शाळेचा उंबरठा पहिल्यांदाच ओलांडून शाळेत प्रवेश करणा-या नवीन मुलांना शाळा हवीहवीशी वाटावे यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी, दर्जेदार तसेच आनंदी वातावरणात प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.*
       *यावेळी प्रशालेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शालेय सल्लागार समितीचे पदाधिकारी, शाळेचे माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक पालक यांच्या उपस्थितीत गुलाबपुष्प देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.,*
     *यावेळी उपस्थित शालेय सल्लागार समितीचे सदस्य बाबुराव जाधव, लक्ष्मण  वंजारी, संजय मोहिते,मेंबर सुनिल मोहिते, पत्रकार मनोज पवार, संजय धोत्रे, मारुती व्यवहारे सर,प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे, उपस्थित पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य हेमंत कदम, स्काऊट शिक्षक महादेव पुजारी यांच्या नियोजनाने शालेय परिसरात पताके,फुगे लावून परीसर  सजवलेले होते. वर्ग सजावट, फलक लेखन यामुळे आकर्षक शालेय परिसर तयार करून विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव कार्यक्रम आनंदाने संपन्न झाला.* 
       *या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पालकांना वर्षभरात शाळेतील विविध स्पर्धा, विविध उपक्रम, शालेय शिस्त,शालेय पोषण आहार योजना यांची माहिती प्राचार्य हेमंत कदम आणि पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी सांगून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल अभंगराव यांनी केले*