*शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांसह पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप......!* *शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा घेतला निर्णय.* *जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या की शिक्षकांच्या हितासाठी.....?

*शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांसह पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप......!*   *शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा घेतला निर्णय.*   *जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या की शिक्षकांच्या हितासाठी.....?

करकंब/ प्रतिनिधी:-

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे वाक्यप्रचार करकंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सिमेंट काँक्रेट असलेल्या भिंतीवर लिहिण्या पुरतेच मर्यादित राहिले असून एकीकडे केंद्र शासन राज्य शासन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये शिक्षण हे तळागाळापर्यंत पोहोचावे या उदात्त हेतूने आणि विचाराने शासन शिक्षणावर करोडो रुपयांचा खर्च या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर खर्च करते. विशेषता मागास प्रवर्ग असलेल्या आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना चांगल्या प्रकारचे शिक्षण या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हावे या उद्दिष्टाने शासन कोट्यवधीचा खर्च करत असताना या विभागाचे अधिकारी मात्र याकडे पूर्णता कानाडोळा करून या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणात्मक दर्जा कडे विशेष लक्ष न देता आर्थिक बाबी कशा मजबूत होतील. याकडे लक्ष दिले असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा गुणात्मक दर्जा असल्याने शिक्षणाचा पूर्णता बोजवारा उडाल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच करकंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरे वस्ती करकंब . या इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक पट 80 ते 100 च्या  आसपास शैक्षणिक पट असताना एकच शिक्षक या मुलांना शिक्षण देतो.
तोही बार्शी वरून ये-जा करून... शिक्षक महाशय कधी शाळा सुरु झाल्यानंतर अथवा शाळा सुटल्यानंतर या मुलांच्या शिक्षणाकडे वेळ द्यावा लागतो
पण तोपर्यंत शाळेची वेळ संपलेली असते. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बसलेल्या मुलांना भिंतीवर लिहिलेल्या शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे वाक्यप्रचार वाचून पाठ झालेला असतो . आणि बिचाऱ्या बार्शीहून नेमणुकीस असलेल्या या शाळेवर शिक्षकाची या शाळेत येईपर्यंत मोठी दमछाक झालेली असते.
करकंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी वस्ती येथील शालेय व्यवस्थापन समिती पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून या शाळेवर चार  शिक्षक असताना केवळ एका शिक्षकावर विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने यापूर्वी वारंवार लेखी तक्रार करूनही शिक्षण विभागाने पूर्णता दुर्लक्ष केल्यामुळे येथील पालक वर्ग शालेय समिती आणि ग्रामस्थांना शिक्षका अभावी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कुलूप ठोकून या शिक्षण विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.करकंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाच किमी अंतरावर असल्याने याठिकाणी पूर्वी चार शिक्षक कार्यरत होते. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरे वस्ती शाळेवरील शिक्षकांची संख्या कमी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यास आज पर्यंत जबाबदार कोण..? याबाबतचे पालक वर्गातून चर्चा केली जात आहे.

चौकट:-

करकंब पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या पांढरे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ची शैक्षणिक पटसंख्या 80 ते 100 च्या आसपास असून या शाळेची झालेली दुरावस्था त्यातच एका शिक्षकावर ही शाळा चालवणे  या शाळे संबंधित गटशिक्षणाधिकारी नाळे, पंढरपूर गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी जिल्हा शिक्षणाधिकारी लोहार, उपशिक्षणाधिकारी जावीर या सर्व संबंधित शिक्षण विभागाला लेखी तोंडी तक्रार दिलेली असतानाही या शालेय व्यवस्थापन समिती पालक आणि या भागातील ग्रामस्थांचे होत असलेले त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसाना  बाबत लक्ष न देता संबंधित शिक्षण विभाग मात्र काळजीपूर्वक शिक्षणाच्या... ऐवजी शिक्षकांची... काळजी करते का..? असा प्रश्न पालक वर्गातून निर्माण झाल्याने आज पहिल्या दिवशीच संबंधित शालेय समिती पालक
 वर्ग आणि ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करून शिक्षकांअभावी शाळा बंद केली आहे.
तेजस्विनी पांढरे.
सरपंच करकंब ग्रामपंचायत करकंब.