*मूर्तीला ..आकार देणारे.. हात... आता देणार जीवनाला आकार.....!* *करकंब येथील कुंभार समाजातील युवक बनला डॉक्टर..*
करकंब/ प्रतिनिधी
:-परंपरागत असलेल्या प्रसिद्ध मूर्तिकार असलेल्या मारुती कुंभार, लक्ष्मण कुंभार आणि चुलत्यांच्या सानिध्यात मूर्तीला आकार देता... देता ...वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आता लोकांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम डॉ. ऋषिकेश लक्ष्मण कुंभार. यांनी सार्थ करून दाखविल्याने विशेषता करकंब येथील कुंभार समाजात प्रथम वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवल्याने त्याचे कुंभार समाज बांधव आणि विशेषता ग्रामस्थ, मित्र परिवाराकडून विशेष अभिनंदन केले जात आहे.

डॉ. ऋषिकेश लक्ष्मण कुंभार यांनी एम. व्ही. एस. आयुर्वेद महाविद्यालय विजापूर . या महाविद्यालयातून बी .ए. एम .एस.( आयुर्वेदाचार्य) ही पदवी संपादन करून मोठे यश प्राप्त केले आहे. डॉ. ऋषिकेश लक्ष्मण कुंभार याचे प्राथमिक शिक्षण - इयत्ता पहिली ते चौथी(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक दोन.), माध्यमिक शिक्षण-इयत्ता पाचवी ते दहावी(यशवंत विद्यालय भोसे.), उच्च माध्यमिक शिक्षण-अकरावी ते बारावी (सुरवसे हायस्कूल सोलापूर.), व वैद्यकीय शिक्षण- (ए. व्ही. एस. आयुर्वेद महाविद्यालय विजापूर.) पूर्ण केले.
जे लहानपणापासून मूर्तीला आकार देणारे हात आता... गरजू सर्वसामान्य समाजातील लोकांच्या जीवनाला वैद्यकीय क्षेत्राच्या सेवेचा आधार देणार असल्याचे बोलले जात आहे. डॉ. ऋषिकेश लक्ष्मण कुंभार यांच्या या यशाचा परिश्रमा मागे प्रसिद्ध मूर्तिकार आजोबा- मारुती कुंभार, वडील-लक्ष्मण मारुती कुंभार (सर) व त्यांच्या सर्व कुटुंबाचे मोठे योगदान असल्याची भावना अनेक कुंभार समाजातील व ग्रामस्थांनी व्यक्त केली.