*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये एस.पी. स्कूलचा दबदबा.* *तब्बल सहा विद्यार्थी बक्षीस पात्र*.
करकंब /प्रतिनिधी :-
मळोली ता. माळशिरस येथील जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये नांदोरे ता.पंढरपूर येथील एस.पी.स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नऊ पैकी तब्बल पाच क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे ,सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सूरज अलगुडे, मराठी विभाग प्रमुख साईनाथ कुंभारव शिक्षक यांनी केले.
यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी गटामधून तनिष्का माधव बाबर व तन्वी केशव बाबर यांनी विभागून प्रथम , ऋतुजा महादेव सातुरे, द्वितीय क्रमांक, पाचवी ते सातवी गटामधून स्नेहल समाधान सरवदे प्रथम , वेदांत संतोष वलगे द्वितीय क्रमांक तर आठवी ते दहावी गटामधून श्रेया अश्वराज वाघ हिने द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूल मधील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.