*पंढरपूर हमालपंचायतच्या अध्यक्षपदी ढोले तर उपाध्यक्षपदी सुरवसे व भुईटे* *हमालमापाडी कामगारांनी एकत्र येवून आपल्या हक्कासाठी लढा द्यावा -: जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे*
। पंढरपूर,/प्रतिनिधी
सर्व हमाल, तोलार कामगार बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येवून लढा उभा करणे गरजेचे असल्याचे सोलापूर जिल्हा हमाल मापाडी पंचायतचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्रराज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस शिवाजी शिंदे यांनी हमाल कामगार बाधंवाच्या पदाधिकार्यांच्या निवडीमध्ये सांगितले. ते पंढरपूर हमाल मापाडी कामगारांच्या निवडी करताना बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर हमाल भवनमध्ये झालेल्या हमाल बाधंवांच्या बैठकीमध्ये पंढरपूर हमाल मापाडी पंचायतचे अध्यक्ष म्हणून सिध्दनाथ ढोले यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी गजानन भुईटे व नवनाथ सुरवसे यांची निवड करण्यात आली. वांदे कमेटी म्हणून हरीभाऊ कोळी व श्रीमंत डांगे यांची तर संघटक म्हणून सचिन पोरे आणि सह सचिव म्हणून संतोष सावंत यांची निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी जाहिर केली. तर संघटनेचे सल्लागार म्हणून सुभाष जाधव, उत्तरेश्वर गोपणे, पोपट शेंडगे, राजाराम ढोले, प्रकाश कदम, भिमा धनवे, कैलास गांडुळे, मधु वाघ, अंकुश कदम व राजेंद्र पवार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष सिध्दनाथ ढोले यांनी सांगितले की, डॉ.बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळामार्फत जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी हमाल मापाडी पंचायत मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. या सर्व हमाल बांधवांच्या आडीआडचणी सोडवून अनोंदीत कामगारांना नोंदीत करून माथाडी बोर्डातून त्यांचे पगार काढण्यासाठी व संघटना बांधणीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर माजी अध्यक्ष सुभाष जाधव यांनी पंढरपूर बाजारपेठेमध्ये अनेक अनोंदीत कामगार काम करीत आहेत. त्यासाठी माथाडी बोर्डांना पत्र देवून संबंधीत दुकानदार व आडतदार यांना नोटीस देवून त्या ठिकाणी नोंदीत कमगाराकडूनच कामे करून घ्यावीत असे सांगितले. तर महाराष्ट्रराज्य वखार महामंडळ पंढरपूर येथे तात्पुरत्या नोंदीत केलेल्या कामगारांना आपण रोटेशनप्रमाणे काम देत असुन सुध्दा काही बाहेरच्या टोळ्या वखार महामंडळामध्ये दबावात्मक माथाडी बोर्डामध्ये दहशत निर्माण करून पंढरपूर वेअर हाऊसमध्ये घुसण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे तसे झाल्यास महाराष्ट्रराज्य हमाल मापाडी मंडळ, सोलापूर जिल्हा हमाल मापाडी पंचायत व पंढरपूर हमाल मापाडी पंचायत तीव्र आंदोलन करून जशास तसे उत्तर देवून त्या ठिकाणी कायमस्वरूपी असणार्या कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही व बाहेरील टोळ्यांना रोटेशनप्रमाणेच काम दिले जाईल असा इशरा वांदे कमेटीचे अध्यक्ष हरीभाऊ कोळी व श्रीमंत डांगे यांनी दिला आहे. निवडीनंतर सर्व पदाधिकार्यांचे सत्कार जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे व मार्केट कमेटीचे संचालक अबाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंढरपूर हमाल मापाडी पंचायतचे कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.