*भोसे येथे आरोग्य तपासणी शिबीरात दोनशे महिलांची तपासणी*.
करकब/प्रतिनीधी
: महिला या कुटुंबाचा पाया असतात त्यांच्यावर स्वतःबरोबरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे त्यांचे आरोग्य व्यवस्थित असणे गरजेचे असते. यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन सरपंच अॅड. गणेश पाटील यांनी केले.
ते भोसे (ता. पंढरपूर) जानुबाई देवी महिला ग्रामसंघ वर्धापन दिन व राष्ट्रीय पोषण महिना निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे (ता. पंढरपूर) यांचे वतीने आयोजित केलेल्या महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी दोनशे चार महिलांची एच.बी., बी.पी. थायरॉड, शुगर आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, वैद्यकीय अधिकारी विजयकुमार सरडे, समुदाय आरोग्य अधिकारी सचिन गुटाळ, अनिरुद्ध नाईकनवरे, आरोग्य सेविका रुपाली सुतार, डॉ. पूजा पवार, ग्रामसेवक डी.बी.भुजबळ, तालुका व्यवस्थापक समाधान खुपसे, प्रभाग समन्वयक वैभव चव्हाण आदि उपस्थित होते.
यावेळी येथील ५२ ग्रामसंघाच्या माध्यमातून साडे पाचशे महिला जोडल्या गेल्या असून त्यांना छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून कर्जाची उपलब्धता करून देणे व त्याची परतफेड करणे यामधून महिला सक्षमीकरण करणे आदि कामे संघाच्या माध्यमातून सुरु असल्याचे जानुबाई महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रियंका कोरके यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सेवक अमोल माने, बँक सखी सुजाता वगरे, कोषाध्यक्ष सविता कस्तुरे, लेखापाल अर्चना जाधव व सोनाली कुंभार, प्रियंका कोरके, ग्रामसंघाच्या महिला आदींसह अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सोनाली कुंभार यांनी केले तर आभार वैभव चव्हाण यांनी मानले.