*एकलव्य अभ्यासिकेचे करकंबमध्ये भुमीपूजन संपन्न* करकंब/ प्रतिनिधी:-

*एकलव्य अभ्यासिकेचे करकंबमध्ये भुमीपूजन संपन्न*  करकंब/ प्रतिनिधी:-

करकंब/ प्रतिनिधी:

करकंब येथील  निवृत्त पोलीस अधिकारी मा.रघूनाथ जाधव आणि तरुणांच्या संकल्पनेतून   प्रथमच युवकांसाठी अभ्यासिकेचे भुमीपूजन मा. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, विरोधी पक्षनेते राहुलकाका पूरवत, जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुंढे , माजी ग्रामपंचायत सदस्य शरदचंद्र पांढरे,सतिश देशमुख, अभी छाया प्रतिष्ठान समूहाचे अध्यक्ष अमोलदादा शेळके,अभिनेता प्रितम भंडारे,प्रशांतकुमार मोरे,राजेश शहा,रमेशखारे,एल.एम.जाधव दत्तात्र्य खंदारे,राहुल शिंगटे, ग्राम विकास अधिकारी सतीश चव्हाण,जागर टीमच्या अंजली टकले देवकी दुधाणे,गुळमे मँडम,पत्रकार भिमा व्यवहारे,राजेंद्र करपे,सचिन शिंदे,मनोज पवार,गोपीनाथ देशमुख,,ऋषीकेश वाघमारे,प्राचार्य शिक्षक बांधव एकलव्य अभ्यासिकेचे अध्यक्ष रघूनाथ जाधव व एकलव्य टीम,यांचे शुभहस्ते नारळ फोडून भुमीपूजन करण्यात आले.सुरुवातीला प्रास्ताविकात माजी पोलीस अधिकारी रघूनाथ जाधव यांनी ग्रामीण भागातील तरुण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मागे पडतात आता ही स्थिती करकंब मध्ये न राहता अद्यावत अशी अभ्यासिका बनवून प्रत्येक महिन्याला नामांकीत व्यक्तींचे व्याख्यान ठेऊन युवकांना प्रोहत्साहित करण्याच काम या माध्यमातून करण्यात येणार आहे, यावेळी बाळासाहेब देशमुख,सतीश देशमुख,आदीनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे,राहुलकाका पुरवत,सलगर सर,हेमंत कदम सर,विजया उंडे मँडम,संजीवकुमार म्हेत्रे, यांनी मनोगतात करकंब गावातील युवकांसाठी अतिशय उपयुक्त अशी आशादायक अभ्यासिका असून पुढील भविष्य काळात नक्कीच अधिकारी बनण्यासाठी एक आदर्श अभ्यासिका बनेल यासाठी आमच्या सर्वांचे निश्चित अर्थिक योगदान मिळेल असे अश्वासन दिले,या अभ्यासिकेच्या माध्यमातून करकंबमधील तरुण चांगल्या प्रकारचे अधिकारी बनतील. अशी आशा व्यक्त केली,या वाचनालयासाठी रघूनाथ जाधव यांनी २ गुंठे जागा,व १ लाख रुपये,पांडूरंग काटवटे २५०००/-ज्ञानेश्वर दुधाणे २१०००/-सागर गायकवाड १५०००/-प्रमोद रेडे १५०००/-राजेंद्र करपे १५०००/-हरिश्चंद्र वास्ते १५०००/-अविनाश ठोंबरे १५०००/- विजय जाधव.११०००/- आत्माराम चवरे ११०००/-नागेश खारे ५०००/-  व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश शहा 
अमोलदादा शेळके,दत्तात्रय खंदारे यांनी प्रत्येकी ११०००/-रोख देणगी दिली.पहिल्याच दिवसी २,८१,००० रुपये जमा झाले. या वाचनालयासाठीअनेक अधिकारी, पदाधिकारी,व करकंब ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून अद्यावत अभ्यासिका दिवाळी पाडव्यापर्यंत बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकलव्य टिमचे सागर गायकवाड,पांडुरंग काटवटे,प्रमोद रेडे राजेंद्र करपे, हरिश्चंद्र वास्ते,आत्माराम चवरे,अविनाश ठोंबरे,नागेश खारे,चेतन पुरवत,खंडू परदेशी यांनी  परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  ज्ञानेश्वर दुधाणे.यांनी तर आभार सचिन माळी यांनी मानले,यावेळी करकंब मधील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.