*अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवणार.*    *पालकांचा इशारा.*

*अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवणार.*    *पालकांचा इशारा.*

करकंब(प्रतिनिधी) :- 

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे माळा येथे त्वरित शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी. यासाठी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना निवेदन देण्यात आले.

 जिल्हा परिषद शाळा आंबे मळा येथील शाळेस दोन शिक्षक मंजूर असून या ठिकाणी गेली सहा महिने झाले एका शिक्षकाची बदली झाली असूल्याने या ठिकाणी दुसरा शिक्षक नेमण्यात यावा तसेच सध्या असणारे शिक्षक हे वैद्यकीय रजेवर असून या ठिकाणी पूर्ण वेळ व नियमित शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

  कोरोना कालावधीमध्ये कित्येक दिवस शाळा बंद होत्या ऑनलाईन शिक्षण सुरू होते  त्यानंतर शाळा सुरू झाल्या मात्र या शाळेमध्ये शिक्षकाची उपलब्धता नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अतोनात नुकसान होत असून याकडे प्रशासन ने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून त्वरित शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी अन्यथा गटविकास अधिकारी पंढरपूर यांच्या दालनात प्रति शाळा भरवण्यात येईल असा इशारा ग्रामस्थ व पालकांनी दिला आहे.

  यावेळी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या जिल्हा परिषदेने  शाळेने आत्तापर्यंत  प्राचार्य,  अनेक इंजिनीयर,डॉक्टर,शिक्षक, उद्योगपती,खेळाडू,नामवंत विद्यार्थी घडविले असून एक नावाजलेली जिल्हा परिषद शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद सोलापूर यांचा आदर्श शाळा पुरस्कार हा देखील या शाळेला मिळालेला असून या शाळेची सध्या गंभीर अवस्था झाली असून प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.

   नावलौकिक आणि नावाजलेल्या शाळेची अशी दुरवस्था बघून पालक वर्ग देखील या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात ठोस भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.यावेळी प्रत्यक्ष गटविकास अधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले यावेळी विजयसिंह जाधव,विठ्ठल सलगर ,शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष पांडुरंग सलगर,तानाजी सलगर, शिवाजी सलगर, अविनाश जाधव, विलास सलगर, संजय सलगर इत्यादी पालक उपस्थित होते.