*आ.आवताडे यांचा  50 हजार वृक्षारोपण करण्याचा मानस* *मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होणार वृक्षारोपण* *पंढरपूर तालुक्यातील  शासकीय अधिकाऱ्यांना सहभागी होण्याच्या सूचना*

*आ.आवताडे यांचा  50 हजार वृक्षारोपण करण्याचा मानस*  *मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होणार वृक्षारोपण*  *पंढरपूर तालुक्यातील  शासकीय अधिकाऱ्यांना सहभागी होण्याच्या सूचना*

पंढरपूर /प्रतिनिधी 


राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्ष लागवड करणेचा मानस  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे  आमदार समाधान  आवताडे यांनी केला आहे. यासाठी बुधवारी दि 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख यांची बैठक, येथील तहसील कार्यालय  येथे घेण्यात आली.  यामध्ये तब्बल 50हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे.यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही आ.आवताडे यांनी या बैठकीत करण्यात आले आहे.

 या स्तुत्य उपक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील शासकीय कार्यालयानी स्वयं स्फूर्तीने वृक्ष लागवड करावी. तसेच वृक्षांची जोपासना करावी. वृक्ष लागवडीसाठी  सामाजिक वनिकरण विभाग पंढरपूर यांच्यामार्फत मार्फत रोपे पुरविण्यात येणार आहेत तसेच ट्री गार्डची आवश्यकता भासल्यास सामाजिक संस्था अथवा सी.एस.आर. फंडमधून देण्यात येतील . असेही यावेळी सूचित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय कार्यालयाने पंढरपूर तालुका व शहर परिसरात एकूण 50हजार झाडे लावून ,एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणेबाबत आ. समाधान आवताडे यांनी सूचित केले आहे
.यानुसार सर्व विभाग प्रमुख यांनी  रिकाम्या शासकीय जागा, रस्त्याच्या दुतर्फा, तलाव-ओढा परिसर, इरिगेशेन कॅनॉल पट्टी, शायकीय कार्यालय  परिसर इत्यादी ठिकाणी वृक्ष रोपण करण्याचे नियोजन करावे. असे सांगण्यात आले.

या बैठकीसाठी   सचिन इथापे उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर व  सचिन लंगुटे तहसीलदार पंढरपूर  सुशील संसारे गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर,श्रीमती पूजा अवताडे तालुका भूमि अभिलेख कार्यालय पंढरपूर, श्री विजय पाटील कार्यकारी अभियंता महावितरण पंढरपूर , बी एम मिटकरी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर,  विशाल माने कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग पंढरपूर, श्रीमती शीतल साठे वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर,  टी वाय मुजावर पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, श्रीमती रेखा घनवट पोलीस निरीक्षक पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे,  सूर्यकांत मोरे तालुका कृषी अधिकारी पंढरपूर, श्रीमती सुवर्ण हाके प्रशासन अधिकारी नगरपरिषद पंढरपूर, राहुल चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी पंढरपूर,  पि.के डोके उपविभागीय जलसंधारणा अधिकारी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग पंढरपूर,  मोरे गटशिक्षण अधिकारी पंढरपूर उपस्थित होते.