*करकंब येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संभाजी ब्रिगेड व मनसेच्या वतीने विनम्र अभिवादन.....!*
*करकंब/प्रतिनीधी
करकंब येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संभाजी ब्रिगेड व मनसेच्या वतीने विनम्र अभिवादन.....!*करकंब प्रतिनिधी:-येथील महामानव डॉ. - बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य अशा भारतरत्न डॉ. -बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीच्या सोहळ्याचे औचित्य साधून करकंब येथील संभाजी ब्रिगेडचे करकंब शहराध्यक्ष -किरण घाडगे तसेच तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष -बालाजी पवार यांच्या शुभहस्ते करकंब येथील छ.थोरली वेस् येथे मिरवणूक आल्यानंतर भारतरत्न डॉ.- बाबासाहेब आंबेडकर. यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.