व्यंकटराव भालके यांच्या हस्ते मंगळवेढा कोविड सेंटरमधील रुग्णांना फळे अन अंडी वाटप! विविध मान्यवरांचे वाढदिवसाच्या निमित्ताने  केले वाटप

व्यंकटराव भालके यांच्या हस्ते मंगळवेढा कोविड सेंटरमधील रुग्णांना फळे अन अंडी वाटप!  विविध मान्यवरांचे वाढदिवसाच्या निमित्ताने  केले वाटप

पंढरपूर:प्रतिनिधी

 माजी जि. प.सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते व्यंकटराव भालके यांच्या हस्ते मंगळवेढा येथील कोव्हिड सेंटर मधील रुग्णांना अंडी व सफरचंद वाटप करण्यात आले.
 ना.दत्ता(मामा)भरने पालकमंत्री, सोलापूर जिल्हा,मा. बळीराम काका साठे,जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस,मा मारुती वाकडे,अध्यक्ष,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस व त्यांच्या पत्नी अप्रुका मारुती वाकडे, मा.रामभाऊ वाकडे, माजी व्हॉईस चेअरमन दामाजी कारखाना,तसेच अशोक माने,सोशल मीडिया प्रमुख,मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ,अजित यादव आदि सह अनेकजणांचा  आणि तत्कालीन शासकीय मार्गदर्शनानुसार ज्यांची शाळेत जन्मतारीख 1 जून लागली आहे असे सर्व द्विजन्म दिनांक धारक व ज्यांचा खरेच 1 जूनला जन्म झाला आहे अश्या सर्वांचा आज वाढदिवस आहे.त्या निमित्ताने हे वाटप करण्यात आले.
       
                                    या वेळी मा.मारुती वाकडे वाकडे,अध्यक्ष,पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ काँग्रेस, मुझमील काझी,शहराध्यक्ष, मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेस, अशोक माने,सोशल मिडिया प्रमुख, मंगळवेढा तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस,संदीप फडतरे,अध्यक्ष,मंगळवेढा तालुका युवक काँग्रेस,सचिन फडतरे,चंद्रकांत जाधव,सौरभ घोडके, श्याम थिटे,डॉ. भाग्यश्री सावंजी,डॉ. अरव कांबळे,प्रमोद शिवशरण, निखिल मिसाळ,रविना नाईकनवरे कोव्हिड सेंटर कर्मचारी उपस्थित होते.