*करकंब पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस उपनिरीक्षक कैलास हरिहर यांचे उपचारादरम्यान निधन.

*करकंब पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस उपनिरीक्षक कैलास हरिहर यांचे उपचारादरम्यान निधन.

करकंब /प्रतिनिधी:

-करकंब पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस उपनिरीक्षक -कैलास सुभिदर हरिहर(वय- ५१ वर्षे) हे करकंब पोलीस ठाणेस नेमणुकीस होते. हरिहर यांना दिनांक-११/५/२०२३ रोजी  सायंकाळी- साडेसहाच्या सुमारास करकंब पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असताना स्ट्रोक (झटका) आल्याने त्यांना प्राथमिक उपचाराकरिता जगताप हॉस्पिटल, करकंब येथे दाखल करून लागलीच पुढील उपचाराकरिता सी.एन.एस. हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचाराकरिता दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे आज दिनांक-१०/६/२०२३ रोजी साडेचार वाजता सी. एन. एस. हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारादरम्यान  निधन झाले.
   त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आई -वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा अंत्यविधी मूळ गावी राजुरी ता. करमाळा येथे दिनांक-११ रोजी सकाळी- आठ वाजता होणार आहे.