*पंढरपूर तहसील कार्यालयामार्फत दिव्यांग अपंगांना  अंतोदय शिधा पत्रिकेचे वाटप*

*पंढरपूर तहसील कार्यालयामार्फत दिव्यांग अपंगांना  अंतोदय शिधा पत्रिकेचे वाटप*


 करकंब /प्रतिनिधी
पंढरपूर तहसील कार्यालयामार्फत तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून पंढरपूर तालुक्यातील दिव्यांग अपंग अशा व्यक्तींना कार्यतत्पर असलेले तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी सुशील बेलेकर यांच्या हस्ते नुकतेच अंतोदय या योजनेअंतर्गत पिवळ्या रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.
  यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय चौगुले जिल्हा सचिव संजय जगताप करकम शहराध्यक्ष महेंद्र लोंढे सहसचिव बाळू पेटकर दत्ता धायगुडे अबोली भंडारे समाधान माळी गायत्री दुधाने उमेश गोडसे आदीसह तहसील विभागातील अधिकारी कर्मचारी व दिव्यांग अपंग बहुसंख्येने उपस्थित होते. या अंतोदय शिधा पत्रिके मुळे अपंग दिव्यांग या वंचित लोकांना या योजनेचा निश्चितपणे लाभ होणार असल्याचे तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी सुशील बेल्हेकर यांनी सांगितले.