*आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे करकंब चा पूर्व भागाचे स्वप्न होणार साकार* *करकंब येथील राष्ट्रवादीच्या युवकांनी घेतली भेट... जलसंपदामंत्री ना. जयंंत पाटील आनी *आ. बबनदादा शिंदे     येणार शिवकालीन ताळ्यावर थेट.....*! : *माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अजित सिंह देशमुख यांनी केला पाठपुरावा*. यांचे पूर्व भागाच्या पाणी प्रश्नासाठी आता एक पाऊल पुढे...*.

*आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे करकंब चा पूर्व भागाचे स्वप्न होणार साकार* *करकंब येथील राष्ट्रवादीच्या युवकांनी घेतली भेट... जलसंपदामंत्री ना. जयंंत पाटील आनी *आ. बबनदादा शिंदे     येणार शिवकालीन ताळ्यावर थेट.....*!  : *माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अजित सिंह देशमुख यांनी केला पाठपुरावा*.   यांचे पूर्व भागाच्या पाणी प्रश्नासाठी आता एक पाऊल पुढे...*.

 करकंब/ प्रतिनिधी:

गेल्या दोन वर्षापासून करकंब येथील माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुकाध्यक्ष अजित्सिंह देशमुख, माढा विधानसभा पदवीधर तालुकाध्यक्ष मिथुन चंदनशिवे सर व त्यांचे सर्व सहकारी हे सातत्याने पंढरपूर व माढा मतदार विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब च्या पूर्व भागातील 45  एकर च्या शिवकालीन तळ्यात सिंचनासाठी पाणी आणण्यासाठी व पूर्व भागातील सिंचनाच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे अखेरीस या पाठपुराव्यास यश आले असून माढा पंढरपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या या पाठपुराव्यास आमदार बबनदादा शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकले असून आमदार शिंदे यांच्या या प्रयत्नामुळे राज्याचे जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांनी संबंधित शासनाच्या विभागांना निर्देश दिले असल्याने करकंब च्या पूर्व भागाचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
  आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन करकंब च्या शिवकालीन तलाव व पूर्व भागातील सिंचनाच्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अजित्सिंह देशमुख यांनी नामदार जयंत पाटील यांना करकंब शिवकालीन पाझर तलाव पाहणी करण्यासाठी भेट देण्याचे विचारले असता लगेच नामदार जयंत पाटील यांनी करकंब शिवकालीन पाझर तलावास भेट देण्यासाठी येणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

: करकंब गावातील शिवकालीन तळ्यात सिंचनासाठी पाणी आणण्यासाठी श्री अजितसिंह देशमुखकार्याध्यक्ष- राष्ट्रवादी युवक कांग्रेस यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.  अजितसिंह देशमुख मित्र मंडळाकडून सदर भागाचे सर्वेक्षण करण्यात आले असून अनेक तांत्रिक पर्यायांचे शक्य शक्यतांचे सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.
 अजितसिंह देशमुख मित्र मंडळ व शिष्टमंडळ यांनी संविधान दिनाच्या पूर्व संध्या चे औचित्य साधून  आज राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील  व 
 आमदार  बबन दादा शिंदे यांची मुंबई मंत्रालय येथील त्यांच्या शासकीय निवास्थानी भेट घेऊन सदर विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्या वेळी   मिथुन चंदनशिवेअध्यक्ष- राष्ट्रवादी पदवीधर संघ माढा विधानसभा
अजितसिंह देशमुख यांनी सदर भागाचा नकाशा आणि इतर कागदपत्रे माननीय मंत्री महोदय यांना सादर करून सविस्तर सादरीकरण केले आणि प्रशासनाने या प्रलंबित प्रश्नावर उचित कार्यवाही करावी अशी विनंती केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील व  आमदार 
बबनदादा शिंदे व यांनी या बाबींची दखल घेऊन आपण स्वतः जातीने या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचे व करकंब गावाला शिवकालीन तलावास भेट देणार असल्याचे नमूद केले आणि तात्काळ महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रजपूत आणि जलसंपदा विभाग पुणे विशेष प्रकल्पाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ बाळासाहेब देशमुख सरकारी सचिव जलसंपदा विभाग यांना उचित  कार्यवाहीचे निर्देश दिले.
करकंब गावातील अतिशय प्रतिकूल अशा भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नेहमीच पाण्याचा प्रश्न नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे.
हा प्रलंबित प्रश्न लवकरच सुटणार असून करकंब गावातील सिंचनासाठी लवकरच पाणी उपलब्ध होईल असे समाधान नागरिकांकडून व्यक्त होत आहे .सदर शिष्टमंडळात श्री अशोक देशमुख ,संतोष शिंदे, नितीन दुधाळ, रामचंद्र सलगर, डॉ चव्हाण ,महेश गुजरे शैलेश जवारे,  राजेंद्र खारे, भैरवनाथ वाफळकर, प्रकाश काका नागरस, इत्यादी 
यावेळी उपस्थित होते. व बसवराज मुन्नाळे  (मुळशी धरण प्रमुख) व राष्ट्रवादीचे नेते महेश (अण्णा )कोठे माजी महापौर सोलापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले.