*करकंब व परिसरात ऊस वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले* *उस वाहतुकीमुळे काहीजण यम सदनात.... तर काहीजण स्वर्गाचे दारात...*..! *कारखानदारांचे दुर्लक्ष*

*करकंब व परिसरात ऊस वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले*  *उस वाहतुकीमुळे काहीजण यम सदनात.... तर काहीजण स्वर्गाचे दारात...*..! *कारखानदारांचे दुर्लक्ष*

 करकंब /प्रतिनिधी:

सध्या ऊस गळीत हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर कुमूरदास सहकारी साखर कारखाना माढा् व इतर सहकारी साखर कारखान्यांना ऊस वाहतूक पंढरपूर-करकंब-वेणेगाव चौक मार्गे माढा तालुक्यातील कारखान्यांना, तसेच पंढरपूर तालुक्यातील व करकंब परिसरातील ऊस वाहतूक करकंब मार्गे जळवली चौक ते विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2, व पुढे पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर, जळवली उंबरे श्रीपुर, नांदुरे पेहे नेमतवाडी ते नेमतवाडी चौक येथून ही ऊस वाहतूक केली जात आहे. नेमतवाडी चौक ते नेमतवाडी पेहे नांदुरे या ऊस वाहतुकीमुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप भोगावा लागत आहे त्यातच अशा ऊस वाहतुकीमुळे प्रचंड अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक जणांना यमसदनी जावे लागले तर काहीजणांना स्वर्गाचे दार पोचून माघारी यावे लागले तर काही जण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
     करकंब येथील नेमतवाडी चौक ते नेमतवाडी ते पेहे नांदोरे पुढे अकलूज कडे जाणारा मार्ग, तसेच जळवली चौकातील जळवली उंबरे करोळे या रस्त्याची अवस्था प्रचंड बिकट झालेले असतानाही या रस्त्यावरून चालणेही मुश्कील असताना मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते परंतु या दोन्ही रस्त्याचे अद्याप चांगल्या पद्धतीचे डांबरीकरण झाले नाही. सध्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट पणे काम होत असल्याचे लोकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी या भागातील शेतकरी वर्ग व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

  हे सर्व साखर कारखाने आजी-माजी आमदारांचे असतानाही सामान्य लोकांचे वाहनधारकांचे जीव धोक्यात घालून आपली कारखानदारी कशी टिकेल या उदात्त हेतूने सामान्यांच्या जीवाची काळजी न करता मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक कशी होईल असा आटापिटा हे कारखानदार रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून करीत आहेत. परंतु सामान्य लोकांचे वाहनधारकांचे यामुळे जीवन धोक्यात आले आहे. खाजगी उपचार लोकांना परवडत नाही. रस्त्यांची प्रचंड बिकट अवस्था अशात ऊस वाहतुकीमुळे होणारे प्रचंड अपघात यामुळे या भागातील सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाला आहे. या ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेल्या ट्रॅक्टर मुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना याचा प्रचंड मानसिक त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे कारखानदारांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.मात्र हे कारखानदार चालवणारे आजी- माजी आमदार बिनधास्तपणे कोटी च्या गाडीमध्ये फिरून एसीत बसून नियोजन करत असल्याने सामान्य वाहनधारकांचे यांना कोणतेही सोयरसुतक नाही असे करकंब सह 42 गावातील तसेच पंढरपूर तालुक्यातील येणाऱ्या-जाणाऱ्या सामान्य वाहनधारक का मधून बोलले जात आहे.