*करकंब येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.*

*करकंब येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.*

करकंब/ प्रतिनिधी:-

येथील समस्त चर्मकार महासंघाच्या वतीने परमज्ञानी संत शिरोमणी, सामाजिक परिवर्तनाचे महानायक-"श्री संत रोहिदास महाराज "यांच्या ६४६ व्या जयंतीनिमित्त करकंब येथील "रोहिदास नगर" येथे रविवार दिनांक-५/2/2023 रोजी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष- दिनेश कांबळे. यांनी दिली.
       या जयंती सोहळ्यानिमित्त दिनांक ५ फेब्रुवारी२०२३ रोजी "संत शिरोमणी श्री. रोहिदास महाराज " यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून विविध धार्मिक उपक्रमांनी हा जयंती सोहळा संपन्न होणार आहे.
     हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी करकंब चर्मकार महासंघ परिश्रम घेत आहेत.