*आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात परिपूर्ण प्राथमिक  शिक्षण मिळणे काळाची गरज - कल्याण काळे*  *रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ*

*आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात परिपूर्ण प्राथमिक  शिक्षण मिळणे काळाची गरज - कल्याण काळे*  *रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ*

पंढरपूर/प्रतिनिधी
वाडीकुरोली ता. पंढरपूर आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होणे गरजेचे असून  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय  होण्यासाठी रायझिंग स्टार पब्लिक स्कूल महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी केले ते रायझिंग स्टार पब्लिक स्कूल वसंतनगर वाडीकुरोली च्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या  शुभारंभ प्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन वाटचालीच वेध घेऊन त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
 यावेळी संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील महादेव नाईकनवरे रावसाहेब देशमुख कांतीलाल काळे  सचिव बाळासाहेब काळे सरपंच सुप्रिया काळे पांडुरंग कौलगे नवनाथ माने संतोष ननवरे रणजित लामकाने  रामचंद्र कौलगे  प्राचार्य दादासो खरात संतोष गुळवे माजी प्राचार्य शिवाजी बागल हणमंत जमदाडे  व पालक बहुसंख्येने उपस्थित होते .सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते  गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या गीतांजली खाडे यांनी केले यावेळी त्या म्हणाल्या की  आधुनिक सोयी सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  व्यक्तिमत्त्व  विकासासाठी कटिबद्ध राहू . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हेमा भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमास वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते