*करकंब येथून एस.पी. स्कूलच्या स्कूल बस सेवेचा शुभारंभ.*   *14 वर्षात उल्लेखनीय कामगिरी*.  *विशेष गुणवत्ता व राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळवणारी एस पी स्कूल ची वाढती क्रेझ*.

*करकंब येथून एस.पी. स्कूलच्या स्कूल बस सेवेचा शुभारंभ.*    *14 वर्षात उल्लेखनीय कामगिरी*.  *विशेष गुणवत्ता व राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळवणारी एस पी स्कूल ची वाढती क्रेझ*.

*
करकंब /प्रतिनिधी

:नांदोरे सारख्या ग्रामीण भागामध्ये चौदा वर्षापूर्वी सुरू केलेल्या एस.पी. स्कूलने आजपर्यंत दिलेली विशेष गुणवत्ता, वैयक्तिक लक्ष, स्कॉलरशिप, ऑलिंपियाड, मंथन, नवोदय यांसारख्या परिक्षांमध्ये मिळविलेले उल्लेखनीय यश तसेच क्रिडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत मिळवलेले यश त्यामुळे आज एस.पी. स्कूलच्या बसची संपूर्ण परिसरातून मागणी होत आहे.
 महात्मा गांधी यांनी दिलेल्या " खेड्याकडे चला " या नाऱ्याप्रमाणे आज श्रीपुर ,खेडभोसे, भोसे, करोळे , उंबरे पागे येथून स्कूलबसची सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे परंतु करकंब सारख्या ठिकाणावरून सुद्धा पालकांची वाढती मागणी लक्षात घेता आज करकंब,भोसे, शेवते या मार्गावरून नवीन स्कूलचा शुभारंभ करकंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री.निलेश तारु साहेब व डॉ. प्रशांतकुमार मोरे यांचे शुभहस्ते नुकताच करण्यात आला यावेळी एस.पी.स्कूलचे डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ ,खजिनदार विक्रम भिंगारे ,पोलीस हवालदार संदीप गिरमकर, पत्रकार विश्वनाथ केमकर, पत्रकार लक्ष्मण शिंदे,डॉ.आलेकर, नितीन सरडे, ग्रामविकास अधिकारी नितीन फासे, प्रकाश मेणकुदळे, सचिन कुरणावळ, संजय जानकर, अनिकेत काळे संतोष शेटे यांचेसह विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.