*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर १ करकंब शाळेचे यश*
करकम्ब:-प्रतिनिधी
स्व.यशवंतभाऊ पाटील शिक्षक मंच यांचेवतीने स्वर्गीय राजुूबापू पाटील विचार पुष्प आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे भोसे येथे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जि.प.प्रा.शाळा मुली नं.१करकंब शाळेतील मुलींचे यश बालगटात कु.स्वरा संतोष शेटे इ.२री हिचा तिसरा क्रमांक आला.व लहानगटात स्वरा विशाल रेपाळ इ.४थी हिचा चौथा क्रमांक आला.यावेळी मा.तात्यासाहेब पाटील.युवा नेते गणेश पाटील.जि.प.सदस्य अतुल खरात व धैर्यशील पाटील.यांचे शुभहस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक देवकी कलढोणे. उषा कांबळे.रेखा कांबळे पालक श्री संतोष शेटे विशाल रेपाळ यांनी मार्गदर्शन केले.करकंब केंद्राचे केद्रप्रमुख श्री आप्पासाहेब माळीसर्व पालकांनी अभिनंदन केले.