*बावी ता माढा येथे स्मार्ट अंगणवाडीचे उद्घाटन.*
बावी/ प्रतिनिधी :
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत स्मार्ट अंगण/वाडी प्रकल्पातून बावी ता माढा येथील अंगणवाडी क्रमांक एक या अंगणवाडीचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 रोजी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या जि प सदस्या मा रोहिणी ताई मोरे
बालविकास प्रकल्प अधिकारी
मा आनंद जाधव,विस्तार अधिकारी
खेताडे साहेब,
शंभुराजे मोरे ,संचालक जिल्हा दूध संघ
मा तानाजी( मुन्नाराजे )मोरे उपसरपंच बावी
मा, दत्तात्रय मोरे (महाराज ) ग्रा पं सदस्य,सरचिटणीस भा ज पा माढा तालुका
मा नंदकुमार मोरे ग्रा प सदस्य प्रतिनिधी,
आर यू शिंदे पर्यवेक्षिका
चव्हाण मॅडम पर्यवेक्षिका
मिस्कीन मॅडम गडहिरे मॅडम
मा योगेश भांगे मुख्याध्यापक
व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका आर यु शिंदे मॅडम यांनी केले
कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने जनजागृतीपर तसेच स्वच्छता संदेश देणारा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी अंगणवाडीचे स्मार्ट अंगणवाडीत रूपांतर करणाऱ्या अंगणवाडी सेविका वृषाली पद्माकर मोरे यांचे विशेष कौतुक करण्यात आले याप्रसंगी बोलताना जाधव साहेबांनी उर्वरित सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसहभाग वाढवावा अशी विनंती गावकऱ्यांना केले याप्रसंगी तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच पर्यवेक्षिका उपस्थित होत्या गावातील महिलांचा विशेष सहभाग या कार्यक्रमासाठी लाभला याप्रसंगी सौ वृषाली मोरे अंगणवाडी सेविका
सौ काजल भाग्यवंत अंगणवाडी सेविका,अरुणा नागटिळक पालक प्रतिनिधी,
योगेश भांगे मुख्याध्यापक बावी मुन्नाराजे मोरे,दत्तात्रय मोरे,खेताडे साहेब,आनंद जाधव साहेब,रोहिणी ताई मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एम महाराज यांनी केले