*गटशिक्षणाधिकारी साहेब..‌. कुठे नेऊन ठेवली.... करकंबच्या झेडपी शाळा......!* *झेडपीच्या शाळा... आणि महारुद्र नाळेंच्या विद्यार्थी व पालकांना झळा.* *गोलमाल है सब कुछ गोलमाल है...!*

*गटशिक्षणाधिकारी साहेब..‌. कुठे नेऊन ठेवली.... करकंबच्या झेडपी शाळा......!*  *झेडपीच्या शाळा... आणि महारुद्र नाळेंच्या विद्यार्थी व पालकांना झळा.*  *गोलमाल है सब कुछ गोलमाल है...!*

..‌

करकंब /प्रतिनिधी

  :-शाळा..हे जगातील सर्वश्रेष्ठ मंदिर असून या मंदिरातील  शिक्षक ...आणि  शिक्षण... हे महत्वाच्या योगदानाचे प्रतीक म्हणून सन्मान व आदर केला जातो. मात्र पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील जिल्हा परिषद शाळांचे चित्र मात्र विचित्र असल्याने खरंच.. गटशिक्षणाधिकारी साहेब कुठे नेऊन ठेवली आहे करकंब ची झेडपी शाळा.. असा संतप्त सवाल करकंब येथील जिल्हा परिषद शाळेतील असलेल्या पाल्यांच्या पालकांमधून होत आहे.
करकंब येथील पांढरे वस्ती जिल्हा परिषद शाळा या शाळेत शिक्षकांविना शाळा भरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जून महिन्यापासून या शाळेत  62 विद्यार्थी  दाखल आहेत.  शिक्षक मिळावा म्हणून पंचायत समितीमध्ये सुद्धा शाळा भरवण्यात आली,परंतु  तात्पुरता एक शिक्षक  दिला. तोही शिक्षक शाळेत हजर नाही. त्यामुळे शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पंढरपूर तालुक्यात एकेकाळी पांढरे वस्ती जिल्हा परिषद शाळा एक आदर्श शाळा म्हणून प्रसिद्ध होती .
गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्या  मनमानी कारभारामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे.
या शाळेत चार शिक्षक होते. केवळ गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी परस्पर कुणालाही विचारात न घेता करकंब येथील झेडपी शाळांच्या बाबतीत पालकांचे मागणे असताना सुद्धा शिक्षकांच्या आर्थिक व्यवहार करून बदली केल्याचा आरोप पालकातून होत आहे.
तीन महिन्यापूर्वी शिक्षकासाठी ही शाळा पंचायत समितीमध्ये भरल्यानंतर शिक्षक देतोअसे आश्वासन दिले. मात्र अद्यापही शाळेला कायमस्वरूपी शिक्षक दिला नाही. एक शिक्षक मात्र तात्पुरता आहे. आणि आहे त्या शिक्षकांची बदली महारुद्र नाळे यांनी स्वतः  बदली पत्रकावर सह्या करून आर्थिक व्यवहार करुन  केल्याचा आरोप जिल्हा परिषद पांढरे वस्ती च्या पालक वर्गातून होत असल्यामुळे तीव्र संताप होऊन आता पुन्हा एकदा शाळा जिल्हा परिषद मध्ये भरवण्याचा मानस पालकांनी यावेळी व्यक्त केला.
नाळे यांच्या विरोधात लेखी तक्रार करून सुद्धा वरिष्ठांनी दखल घेतली नाही. त्यामुळे सौ ...सोनार की... एक नाले की...! त् असा सगळा मनमानी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बसत असल्यामुळे आठ दिवसात जर शिक्षक नाही मिळाला तर जिल्हा परिषद शिक्षण विभागापुढे शाळा भरवणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्हारी मदने  यांनी  सांगितले.