*श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे  एस. एस. फिलोशीपचे पारितोषिक वितरण* *गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

*श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे  एस. एस. फिलोशीपचे पारितोषिक वितरण*  *गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

पंढरपूर/प्रतिनीधी

पंढरपूर येथीलश्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या   एसएस फीलोशीप परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्यवाह  जितेंद्र  खंडागळे  व  ऍड इफ्तार इनामदार   यांच्या शुभहस्ते फेलोशिप प्राप्त धारक विद्यार्थ्यांना गटनिहाय अनुक्रमे  2हजार,,3हजार, 5हजार या रकमेचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.यावेळेस  श्रीपुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव  कारंडे सर, प्राचार्य  प्रशांत पाटील सर, तसेच डॉक्टर   राहुल इंगोले,  पांचाळ सर,  निलेश मडके,  नंदकुमार जाधव,  दीपक घाडगे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले.
 या कार्यक्रम प्रसंगी प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन करण्यात आला सांगोला येथील उत्कर्ष विद्यालय सह्याद्री इंग्लिश मेडीयम स्कूल, फॅबटेक पब्लिक स्कूल ,सांगोला  विद्यामंदिर सांगोला ,कडलास हायस्कूल कडलास ,गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अनकढाळ येथील एस एस फेलोशी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. इयत्ता चौथी या गटामध्ये पुष्पांजली नवनाथ पाराध्ये (प्रथम ) श्रेया निलेश मडके व अर्णव शशिकांत दिघे (द्वितीय) स्वरा राहुल टेकाळे व रेहान इफ्तार इनामदार (तृतीय). इयत्ता सातवी गटामध्ये श्रेयश दीपक घाडगे (प्रथम),  सानिका राजू चौगुले (द्वितीय), कुमारी श्रावणी धनंजय यादव (तृतीय) ,या फिलोशीप धारक विद्यार्थ्यांना अनुक्रमे (इयत्ता चौथी 2000 रू) ,(इयत्ता सातवी 3000 रू) ,(इयत्ता दहावी 5000 रू), धनादेश सुपूर्द करण्यात आला. गतवर्षी झालेल्या एस एस फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम गट प्रीती नंदकुमार जाधव (प्रथम), समृद्धी राहुल इंगोले (द्वितीय),  गट क्रमांक दोन मध्ये श्रुती बळीराजा संगीत राव या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षीचा धनादेश देण्यात आला.
         ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्षा सौ.सुवर्णा खंडागळे मॅडम,संस्थेचे सचिव संकेत खंडागळे व संस्थेचे कार्यवाह  जितेंद्र खंडागळे साहेब तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल असे  सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
     याचवेळेस दत्तक-पालक योजने अंतर्गत पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.                   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतोष गायकवाड सर यांनी केले व आभार प्रदर्शन  दत्ता जाधव सर यांनी केले.पुढील वर्षी होणाऱ्या 2024 च्या एस एस फेलोशिप परीक्षेसाठी जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभागी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे.असे आवाहन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान च्या वतीने या कार्यक्रमाच्या वेळेस करण्यात आले.