*करकंब मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगामय वातावरण.* *आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांनी जनजागृती प्रभात फेरीचे केले आयोजन*

*करकंब मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगामय वातावरण.*  *आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांनी जनजागृती प्रभात फेरीचे केले आयोजन*

करकंब/ प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना करकंब मधील हजारो विद्यार्थी , शिक्षक व ग्रामस्थ यांनी करकंब गावातून जनजागृती फेरी काढत तिरंगा ध्वज फडकवत घोषणा देत गावात तिरंगा मय वातावरण तयार केले.

करकंब मधील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी 'हर घर तिरंगा घर घर तिरंगा' बाबत संदेश देण्यासाठी जनजागृती प्रभातफेरी काढली होती, या फेरीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रामदास शेटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख, पांडुरंग व्यवहारे, प्राचार्या विजया उंडे, मीनाक्षी शेटे सह शिक्षक उपस्थित होते.

जनजागृती प्रभात फेरीमध्ये लेझीम पथक, पथनाट्य, ढोल पथक विद्यार्थ्यांचे सहभागी झाले होते, मुलींनी केशरी फेटे, मुलांनी तिरंगी टोप्या, तिरंगी उपरणे, तिरंगा ध्वज घेऊन घोषणा देत शिस्तबद्ध फेरी काढली होती.