*करकंब येथील अद्वैता महानंदा मोहन शिंदे रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड.*
करकंब /प्रतिनिधी:
करकंब येथील सुप्रसिद्ध हास्य कलाकार मोहन शिंदे यांची सुकन्या अद्वैता महानंदा मोहन शिंदे ही एम पी एस सी मध्ये उत्तीर्ण झाली असून तिची परीक्षेत्रीय वन अधिकारी (रेंज फॉरेस्ट ऑफिसर) या पदासाठी निवड झाली आहे
अद्वैता महानंदा मोहन शिंदे हिचे चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा करकंब व दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश स्कूल येथे झाले असून त्यानंतरचे कर्मवीर भाऊराव पाटील सातारा येथे तिने उच्च शिक्षण घेऊन तिची या पदावर निवड झाल्याने तिच्या या यशाबद्दल करकंब व परिसरातून कौतुक व अभिनंदन चा वर्षाव केला जात आहे.