*शेतकऱ्यांबरोबरच व व्यापाऱ्यांचे हित जोपासून तालुक्यात सर्वसामान्यांमध्येआर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचे  काम-आमदार बबनदादा शिंदे.* *कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक*

*शेतकऱ्यांबरोबरच व व्यापाऱ्यांचे हित जोपासून तालुक्यात सर्वसामान्यांमध्येआर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचे  काम-आमदार बबनदादा शिंदे.*  *कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक*

करकंब/ प्रतिनिधी:

-कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या माध्यमातून आज पर्यंत शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी यांचे हित जोपासून या माढा तालुक्यात सर्वसामान्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केले असल्याचे मत माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांनी व्यक्त केले. 
       कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी पंचवार्षिक निवडणूकच्या शेतकरी महा विकास आघाडी पॅनलच्या प्रचारसभेत आमदार -बबनदादा शिंदे बोलत होते.
                   माढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रीय -आमदार - बबनदादा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली व करमाळा - माढा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार-संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वाखाली होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडीच्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२८ च्या "शेतकरी महविकास आघाडी" या पॅनलची कुर्डूवाडी गटाची प्रचार सभा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
       यावेळी मा.रणजित भय्या शिंदे, मा.वामनभाऊ उबाळे, मा.संजय पाटील भीमनगरकर, मा.शिवाजीराव पाटील मा.मधुकर आप्पा पाटील,मा.अर्जुनराव बागल, मा.सुहास काका पाटील,मा.संजय गोरे, मा.निवृत्ती आप्पा गोरे,मा.बाबा गवळी, मा.आप्पा उबाळे, मा.व्यंकटेश नाना पाटील,मा. खंडू आप्पा नलवडे, मा.बाप्पा पाटील, मा.मधुकर आण्णा बागल, मा.दत्ता काकडे, मा.सर्जेराव बागल, मा.वसंत आप्पा जगताप,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,बाजार समितीचे सर्व उमेदवार,कुर्डूवाडी परिसरातील सर्व गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,सोसायटीचे चेअरमन,व्हॉईस चेअरमन,सोसायटीचे सदस्य,व्यापारी,हमाल तोलारचे मतदार, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.