*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करकंब येथे सीड बाॅल कार्यशाळा संपन्न* *सामाजिक वनीकरण विभाग पंढरपूर यांच्या वतीने वृक्षारोपण*
करकंब/ प्रतिनिधी:-
डी.ए.व्ही शैक्षणिक संकुल करकंब येथे
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांने संपन्न.
पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांना पर्यावरण समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पर्यावरण दिन साजरा केला जातो.
रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज करकंब येथे वृक्षारोपण व सीड बाॅल कार्यशाळा, प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे समाधान पाटीलसाहेब, एस.ए.कळसाईत साहेब, वनरक्षक संतोष नवगीरे , प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी, मिथुन चंदनशिवे,नामदेव सलगर यांच्या उपस्थित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे सीड्स बॉल तयार करण्याचे कार्यशाळा व प्रात्यक्षिक सादरीकरण करून दाखवले यावेळी विद्यार्थ्याने विविध बियांपासून सीड बाॅल तयार केले त्यामध्ये जांभूळ, करंजी, चिंच, कडूनिंब,बाभूळअशा विविध वनस्पतींचे बीया वापरण्यातआले.
सामाजिक वनीकरण विभागाचे समाधान पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्त्व आणि सीड बाॅल बद्दल माहिती सांगितले.
वनरक्षक संतोष नवगिरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन कसे करावे , कोणती झाडे लावावी याविषयीयाविषयी माहिती सांगितले.
प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने क्रीडांगणावर प्रतीकुल परीस्थितीत लावलेल्या झाडांची संगोपन कसे केले याविषयी आपले अनुभव सांगितले.
वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी सर्व विद्यार्थ्यांना सीडस् बॉल कसे करावेयाचे प्रत्यक्षिक करून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा दिले.
प्रशालेतील भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक नामदेव सलगर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित सर्वांचे आभार मानले.या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिथुन चंदनशिव यांनी केले.