*जळोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप*

*जळोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप*


*करकब/ प्रतिनिधी*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली ता. पंढरपूर येथे आज दि.5   रोजी   समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश नरसाळे , शाळाचे मुख्याध्यापक मोरे सर व उपाध्यक्ष संतोष जाधव यांच्या शुभहस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले*
*जळोली येथील जिल्हा परिषद शाळेत असलेले शिक्षकवृंद खुपच चिकाटीने व जिद्दीने काम करुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहे*. *गावाच्या आजुबाजुला इंग्लिश व मराठी माध्यमाच्या मोठमोठ्या शाळा असतांना सुध्दा शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर व सर्व सहशिक्षक यांनी अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहेत*. *अशातच त्यांना गावातील तरुणांची साथ मिळाल्यामुळे शाळेत विविध विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कार्यक्रमांचे आयोजन करणे, वेगवेगळे उपक्रम राबवुन शाळेचा दर्जा उंचवण्याचे काम गावातील ग्रामस्थ, तरुण व शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व सहशिक्षक करीत आहे*.
*जिल्हा परिषदेकडुन दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप केले जातात. त्याप्रमाणे आज शाळेत मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले*.
*गणवेश वाटप कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवार सर तर सुत्रसंचालकन संतोष कापसे सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला*.