*मोबाईल... टी.व्ही. पासून दूर राहून मुलांनी शिक्षण.. संस्कार.. व व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज-लक्ष्मण कोष्टी*. *25 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा आगळा-वेगळा भरला स्नेह मेळावा...!* *न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा.*
करकंब/ प्रतिनिधी
:- विद्यार्थी दशेत असताना मुलांनी संस्काराबरोबर शिक्षणा ची सांगड घालून सध्याच्या युगात मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहून व्यायामाची आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत न्यू इंग्लिश स्कूलचे मा. शिक्षक -लक्ष्मण कोष्टी सर यांनी व्यक्त केले.
चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या सन -1996 -97 च्या माजी विद्यार्थी- विद्यार्थिनीच्या आयोजित स्नेह मेळावा कार्यक्रमासंगी ते बोलत होते.
चेतना विकास मंडळ संचलित न्यू स्कूलच्या सन-१९९७ च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत जुन्या नव्या शिक्षकासोबत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल प्रशालीमध्ये या सन 1996 97 च्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची सकाळी साडेदहा वाजता शाळा भरली. या कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. मुख्याध्यापिका -कुमुदिनी पूरवत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमा च्याअध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका कुमिदिनी देशमाने ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून चेतना विकास मंडळाचे अध्यक्ष -संजीव कुमार म्हेत्रे, सचिव -अविनाश देवकते, मा. मुख्याध्यापक- भारत खंडागळे प्रसिद्ध व्याख्याते-दादासाहेब पिसाळ सर, लक्ष्मण कोष्टी ,लक्ष्मी शिंदे ,संगीता करमाळकर , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व 35 वून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी एकत्रित आले होते.
शाळेच्या जुन्या आठवणी शिक्षकांचे अनुभव वर्गातील मित्र मैत्रिणीचे अनुभव वेळी सांगण्यात आले.
सर्व शिक्षकांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आंब्याचे झाड शाल देऊन त्यांना गौरव करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली . यावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या बांधकामासाठी एकत्रित निधी गोळा करून बांधकामासाठी मदत करण्याची ग्वाही उपस्थित विद्यार्थ्यांनी दिली.
यावेळी सचिन शिंदे - यांनी एक वीस हजार रुपये, अनिल कवडे- अकरा हजार रुपये,रमेश सरवदे- महिंद्र पाच हजार रूपये,भाग्यश्री मोटे -पाच हजार रुपये, सर्व विद्यार्थ्यांची निधी देणार असल्याचे यावेळी जाहीर केले. विद्यार्थ्यांकडून देणार हा सर्व निधी शाळेच्या बांधकामासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुविधांसाठी वापरला जाईल.
आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत प्रशाले मध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व फुले टाकून ढोल- पथकाच्या गजरात स्वागत केले.
आपल्या मनोगतामध्ये प्रत्येकाने आपल्या जीवनातील अडीअडचणीची वाटचाल आणि प्रगतीचा अहवाल सांगितला.
पंचवीस वर्षानंतर भेट झालेल्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित गप्पागोष्टी करीत स्नेहभजनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव थोरात ,प्रस्ताविक सचिन शिंदे तर उपस्थित मान्यवरांचे आभार भाग्यश्री आमले यांनी व्यक्त केले.