*करकंब येथील लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करकंब पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.* *लिटिल बर्डच्या इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने केला साजरा.*
करकंब/ प्रतिनिधी :
-येथील आदर्श शिक्षण प्रसार मंडळ संचलित लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी करकंब पोलीस ठाण्यात जाऊन करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू तसेच त्यांच्या सर्व पोलीस सहकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन चे औचित्य साधून हा रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू, सहाय्यक फौजदार शशिकांत कविटकर, पोलीस हे. कैलास हरिहर, पोलीस हे.अजित रानगट, पोलीस ह. अरुण कोळवले, पोलीस ह. सलगर, पोलीस ह.भोसले सह बहुसंख्य पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या रक्षा बंधन सणाचे औचित्य साधून पोलीस बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले.
या रक्षाबंधन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका बानू कडगे , सहशिक्षिका काझी, खंदारे व विद्यार्थी- विद्यार्थिनी पोलीस बांधव उपस्थित होते.