*विठ्ठलच्या निवडणुकीत २७ जून नंतर  रंग  बदलणार* *कोण कोणासोबत, कोणता उमेदवार कोणत्या पॅनेलमध्ये चित्र स्पष्ट होणार* *समाधान काळे यांच्या उमेदवारीवरच ठरणार काळे गटाचा अंतिम निर्णय*

*विठ्ठलच्या निवडणुकीत २७ जून नंतर  रंग  बदलणार*  *कोण कोणासोबत, कोणता उमेदवार कोणत्या पॅनेलमध्ये चित्र स्पष्ट होणार*  *समाधान काळे यांच्या उमेदवारीवरच ठरणार काळे गटाचा अंतिम निर्णय*

पंढरपूर /प्रतिनिधी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. एकमेकांवर आरोप करण्यात सुरुवातही केली आहे. परंतु या निवडणुकीतील नेमकी दिशा आजही निश्चितपणे सांगता येणार नसून विद्यमान संचालक समाधान काळे यांच्या उमेदवारीवरच पक्की दिशा समजणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवस म्हणजे27 रोजी आहे. या दिवशी नेमकी कोणत्या इच्छुक उमेदवारांची उमेदवारी ऐनवेळी कोणत्या पॅनल मधून ठरणार आहे. यावरच पुढील निवडणुकीतील खरा रंग दिसणार आहे.
 या निवडणुकीत काळे गट हा महत्वाची भूमिका बजावनार आहे. अशातच भालके गटाकडून संस्था मतदार संघाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार आहे. यावरच काळे गटाची भूमिका अवलंबून राहणार आहे.
सध्या विद्यमान चेअरमन भगीरथ भालके, विद्यमान संचालक युवराजदादा पाटील, आणि धाराशिव चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी सभासदासमोर जाऊन आपली भाषणे सुरू केली आहेत. यामध्ये फक्त पॅनलप्रमुख यांचीच नावे घ्यावी लागत आहेत. मात्र पॅनलच्या उमेदवारांच्या नावावर मात्र शिक्कामोर्तब झाला नाही. 
सध्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे2दिवस बाकी असल्याने पॅनलप्रमुख यांच्यापुढे हे दोन दिवस अत्यंत महत्वाचे असून उमेदवारी देत असताना आपला गट शाबूत राहावा यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
 सध्या  वरील तिन्ही पॅनल कडूनही दावे प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्येक पॅनलच्या प्रमुख नेतेमंडळी कडून यापुढील काळात आम्ही सभासद, कामगार आणि कारखान्याचे कसे भले करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सत्ताधारी भगीरथ भालके कडून यापुढेही आपण स्व भारतनाना भालके यांच्या विचाराने कारखाना चालवून दाखवू असे जाहीर केले आहे. युवराजदादा पाटील गटाकडून कर्मवीर औदुंबरआणाच्या कटकसरीतील विचारातून कारखाना चालवणार असल्याचे सांगितले आहे. तर धाराशिवचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मात्र आपण इतर कारखाने ज्याप्रमाणे चालवून दाखवत असताना जो चोख कारभार करत आहे. अगदी तशाच प्रकारे सर्व शेतकरी आणि कामगार यांच्यासह इतर कारखान्यातील देणी योग्यवेळी देत ,जुनी कारखान्यावरील कर्जे फेडणार असल्याचे जाहीर केले आहे.
वरील पॅनलच्या प्रमुख यांनी ज्या घोषणा सुरू ठेवल्या आहेत. त्यामधील कोणाच्या घोषणा आणि अस्वासन सभासद मतदारांच्या पचनी पडणार आहेत., हे मतमोजणी नंतरच समजणार आहे. हे मात्र नक्की.
 असे असले तरी सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ज्या इच्छुकांची निराशा होणार आहे. ते उमेदवार काय करणार हे28जून पासून समजणार आहे.