* पवार साहेबांचे पाठबळ हीच माझी राजकीय शक्ती* *प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांची खा. शरद पवार यांची दिल्लीत चर्चा*

* पवार साहेबांचे पाठबळ हीच माझी राजकीय शक्ती*  *प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांची खा. शरद पवार यांची दिल्लीत चर्चा*

पंढरपूर /प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे हे दिल्लीत  कामानिमित्त होते.  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची आज दिल्ली मधील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली आहे.

 यावेळी उद्योग व व्यापार विभागाचे विविध विषय व प्रश्न  मांडत यांवर शरदचंद्र पवार साहेब यांचे मार्गदर्शन घेतले. 
या भेटी दरम्यान साहेबांनी केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे असून, त्यामधून साहेबांनी दिलेले पाठबळ हीच माझी खरी राजकीय शक्ती आहे.असे नागेशदादा फाटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत म्हणाले आहेत.