*शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती*  *जिल्ह्यातील पाच निष्ठावंत शिलेदारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची विशेष शिफारस* *शनिवारी झालेल्या बैठकीला उपस्थित राहून प्रश्न मांडण्यासाठी मिळाली संधी*

*शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती*   *जिल्ह्यातील पाच निष्ठावंत शिलेदारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची विशेष शिफारस*  *शनिवारी झालेल्या बैठकीला उपस्थित राहून प्रश्न मांडण्यासाठी मिळाली संधी*

पंढरपूर /प्रतिनिधी 

सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विस्वासू शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर,यांचेसह जिल्ह्यातील पाच शिलेदाराची नियुक्ती करण्यात आली असून यांना शनिवारी सोलापूर येथील बैठकीत उपस्थित राहून प्रश्न मांडण्यासाठी संधी मिळाली आहे.

   मुख्यमंत्री नियुक्त विशेष निमंत्रित सदस्यपदावर पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये  शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर,कुर्डुवाडी शिवसेना शहर प्रमुख समाधान दास,अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख, माळशिरस तालुका प्रमुख सतीश सप्ताळ,समाजसेवक सामी अहमद सकील अहमद मौलवी  यांची नव्याने विशेष निमंत्रित सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
    शिवसेनेचे सचिव यांनी संजय मशीलकर यांनी वरील कार्यकर्त्यांची शिफारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी स्वरूपात केली होती. यावरती मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्तावित करण्याची सूचना केल्याने यावरती पालकमंत्री यांनीही शनिवारी झालेल्या बैठकीपासूनच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना लोकांच्या समस्या सोडवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
   वरील नियुक्ती ही शिवसेना सचिव संजय मशीलकर  यांच्या विशेष प्रयत्नातून  झाली आहे. यानंतर मार्गदर्शक व शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख  चरणराज चवरे ,मनीष काळजी, पंढरपूर तालुका   युवा सेना तालुकाप्रमुख महादेव भोसले, शिवसेना पंढरपूर उपतालुका प्रमुख  गणपत कोलगे, यांचे सह  पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक या सर्वांनी अभिनंदन केले.