*राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी उद्योग सेलच्या प्रदेश अध्यक्षपदी नागेश फाटे यांची निवड* *पंढरपूर मधील राष्ट्रवादीत उत्साह*

*राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी उद्योग सेलच्या प्रदेश अध्यक्षपदी नागेश फाटे यांची निवड*  *पंढरपूर मधील राष्ट्रवादीत उत्साह*

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील उद्योजक तसेच राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांचे खंदे समर्थक, नागेश दादा फाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी धुरा सोपवली आहे . महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी व्यापारी, उद्योग सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यातील काळे समर्थकांमध्ये , तसेच राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य पसरले आहे

.


बुधवारी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात, ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते नागेश फाटे यांना  निवडीचे पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम, उद्योजक नागेश फाटे यांच्याकडून नक्कीच होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


पंढरपूर तालुक्यातील उद्योजक नागेश एकनाथ फाटे , हे गादेगाव गावचे सुपुत्र आहेत. अगदी सुरुवातीपासूनच येथील ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे यांचे समर्थक मानले गेलेल्या फाटे यांनी, आजवर अनेक राजकीय आणि संघटनात्मक राजकीय पदे भूषवली आहेत. सुरुवातीस गादेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य यानंतर उपसरपंचपद भूषवले आहे. पंढरपूर तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष , सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस, जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष या राजकीय पदांच्या माध्यमातून त्यांनी मोठे संघटनात्मक काम केले आहे. येथील काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, याचवेळी नागेश फाटे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता . यानंतर काही दिवसातच त्यांच्या आजवरच्या कामाची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी धुरा सोपविली आहे . व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या फाटे यांची राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस व्यापारी आणि उद्योग सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.
त्यांच्या या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच काळे समर्थकांमध्ये मोठे चैतन्य पसरले आहे.


चौकट

पंढरपूर तालुक्यातील गादेगावचे सुपुत्र , एन. पी. कन्स्ट्रक्शनचे मालक, उद्योजक नागेश फाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी संधी देण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्य प्रदेश व्यापारी उद्योग सेलच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे . मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात , ना.जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र  १४ जुलै रोजी प्रदान करण्यात आले आहे.