*सह्याद्रीचा सिंह गरजला... जय भवानी जय शिवाजी - हर हर महादेव च्या जयघोषात दुमदुमणार.....!*  *तुळजापूर ते वैराग-मोडनिंब-करकंब-अकलूज ते शिखर शिंगणापूर होणार नियोजित राष्ट्रीय राज्य मार्ग*  *खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे लवकरच नियोजित राष्ट्रीय राज्य मार्गाचे काम मार्गी लागणार.*

*सह्याद्रीचा सिंह गरजला... जय भवानी जय शिवाजी - हर हर महादेव च्या जयघोषात दुमदुमणार.....!*  *तुळजापूर ते वैराग-मोडनिंब-करकंब-अकलूज ते शिखर शिंगणापूर होणार नियोजित राष्ट्रीय राज्य मार्ग*  *खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे लवकरच नियोजित राष्ट्रीय राज्य मार्गाचे काम मार्गी लागणार.*

 
 करकंब /प्रतिनिधी

: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष जेपी नड्डा सडक परिवहन मंत्रालय नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सडक परिवहन राज्यमार्ग मंत्रालय यांच्याकडे वारंवार पणे पाठपुरावा करून तसेच या मंत्रालयाकडे दिनांक 22/१०/२०२१ रोजी नियोजित तुळजापूर ते वैराग-माढा-मोडनिंब-करकंब मार्गे-अकलूज शिखर शिंगणापूर पर्यंत राष्ट्रीय राज्यमार्ग रस्ता करण्याबाबतचे लेखी पत्र दिले होते, त्या पत्राच्या अनुसार सडक परिवहन राज्य मंत्रालय यांनी या नियोजित राष्ट्रीय राज्यमार्ग याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्यामुळे आता तुळजापूर ते करकंब मार्ग शिखर शिंगणापूर हा मार्ग लोकांसाठी सामान्यांसाठी,भाविकांसाठी होणार आहे

.
     तुळजापूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, तर शिखर शिंगणापूर मोठे श्रद्धास्थान असल्याने पंढरपूर- माढा -माळशिरस तालुक्यातील या भागातून मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने भाविक भक्त तुळजापूर शिखर शिंगणापूर कडे जय भवानी जय शिवाजी-हर हर महादेव च्या जयघोषात श्रद्धेने यामार्गे जातात येतात. सदरचा हा मार्ग तुळजापूर ते वैराग माढा मोडनिंब करकंब अकलूज ते शिखर शिंगणापूर पर्यंतचा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून भाविकांसाठी व सामान्य लोकांसाठी प्रवासासाठी खडतर झालेला होता . हा रस्ता वारंवार पणे करण्याची मागणी होत असल्यामुळे  प्रलंबित असलेला या रस्त्याचा प्रश्न माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी हा प्रश्न आता मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील करकंब माढा पंढरपूर तालुक्यातील वैराग तसेच अकलूज या भागातील हा मार्ग अत्यंत सोयीस्कर होणार आहे. म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार यांनी सध्या म्हाडा लोकसभा मतदार संघाकडे विशेष लक्ष घातले असून त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातील असलेल्या रस्ते तसेच विविध प्रश्नाच्या बाबत विविध मंत्रालयाच्या माध्यमातून पत्रव्यवहार समक्ष भेटीगाठी या माढा लोकसभामतदारसंघातील आता काम लवकर मार्गी लागेल अशी चर्चा व अशा लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सह्याद्रीचा सिंह गरजला अर्थातच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने माढा लोकसभा मतदार संघात अनेक वर्षाची प्रलंबित कामे असलेली काम करणारे लोकप्रिय खासदार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची चर्चा होऊ लागली आहे.